शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावातील माजी सरपंचाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या माजी सरपंचासाठी आणलेल्या केक वर “भावी आमदार” असा उल्लेख केलेला होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा माजी सरपंच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा कट्टर समर्थक आहे.
शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावचे माजी सरपंच ‘संजय काळे’ यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी जो केक आणला होता. त्यावर “भावी आमदार” असा उल्लेख होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय काळे यांच्या मातोश्री शालन काळे या घोडगंगा सहकारी कारखान्याच्या माजी संचालक आहेत. तर संजय काळे हे आधी निमोणे ग्रामपंचायतचे सदस्य, नंतर घोडगंगा कारखान्याचे संचालक आणि मग निमोणे गावचे सरपंच असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. तसेच शिरुरच्या पुर्व भागात संजय काळे यांचा मोठा गोतावळा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत संजय काळे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का…? हे येणारा काळचं ठरवेल.
शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?
पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे
शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…