शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहत वाढल्याने साहजिक बाहेरच्या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागातुन बेरोजगार युवक कामासाठी येत असतात. काही दिवसानंतर ते इथंच स्वतःचा फ्लॅट घेतात किंवा जागा घेऊन स्वतःच घर बांधतात. त्यामुळे तालुक्यात मोठया प्रमाणात गुंठेवारी वाढली. त्यामुळे महसूल विभागाला चांगले दिवस आले असुन महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात माया गोळा केली आहे.

 

शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असणाऱ्या गावातील तलाठी, मंडल अधिकारी, तसेच पोलिस, औद्योगिक वसाहतीत कंपनीत काम करणाऱ्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारेगाव, रांजणगाव, शिक्रापुर या गावात स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने करोडो रुपयांच्या जमिनी तसेच स्थावर मालमत्ता घेतली असुन कारेगाव येथील यश इन चौकात तसेच रांजणगाव-करडे अष्टविनायक महामार्गालगतही स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने करोडो रुपयांच्या मालमत्ता घेतल्याच्या सध्या दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहेत.

 

स्वतःच्या बिल्डिंग कामगारांसाठी भाड्याने…?

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काही आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यश इन चौकात स्वतःच्या मोठया मोठया चार-पाच मजली इमारती आहेत. ते अधिकारी ज्या कंपनीत कामाला आहेत. तिथं स्वतःच्या मर्जीतील लोकांना कंपनीत कंत्राटी कामगारांचे ठेके द्यायचे आणि त्याच ठेकेदारांच्या कामगारांना स्वतःची इमारत भाड्याने द्यायची असले उद्योग हे कंपनीतील अधिकारी करत आहेत.

 

तलाठी आणि मंडल अधिकारी मालामाल…?

कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव, कारेगाव, शिरुर या ठिकाणी मोठया प्रमाणात प्लॉटिंग झाल्याने तसेच अनेक ठिकाणी गायरान जमीनी असल्याने तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे जमिनीच्या नोंदी, वारसनोंदी किंवा इतर कामासाठी बिल्डर व खरेदी-विक्री करणारे एजंट यांचा राबता असतो. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी हे सातबारा वर नोंद लावण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेत असुन तलाठी व मंडल अधिकारी ‘मालामाल’ झाले असुन शिरुर तालुक्यातील अनेक तलाठी व मंडल अधिकारी यांनी थोड्याचं दिवसात करोडोंची माया जमवली असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमश:)

पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद

शिरुर तालुका भुमिअभिलेख तर्फे गावनिहाय शासकिय सनद वाटप होणार; उपअधीक्षक अमोल भोसले