मुख्य बातम्या

पुणे-नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे. याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. 21) रोजी अश्विन भोंडवे हे बीड वरुन चाकण येथे आपल्या पाहुण्याकडे नगर-पुणे रोडने पुणे बाजुकडे जात असतांना कारेगावच्या हद्दीतील फलकेमळा येथील “हॉटेल महागणपती” समोरुन दुपारी 12:30 च्या सुमारास रोडवर डाव्या बाजूस उभ्या असलेल्या कंटेनर क्र. MH 43 BG 2776 यास पाठीमागुन कार जावुन धडकल्याने अपघात झाला.

त्यात अश्विन भोंडवे यांचे वडील 1) सुदाम शंकर भोंडवे (वय 65 वर्षे) आई 2) सिंधुबाई सुदाम भोंडवे (वय 55 वर्षे), पत्नी 3) कार्तीकी अश्विन भोंडवे (वय 35 वर्षे) , मुलगी 4) आनंदी अश्विन भोंडवे (वय 2.5 वर्षे) सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अश्विन भोंडवे यांनाही किरकोळ दुखापत झाली असुन कंटेनर चालक नामे बबलु लहरी चव्हाण (रा.कुनगाईखुर्द, पो. इटवा कुनगाई, थाना-पैकोलिया, ता. हरय्या, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) याच्या विरुध्द भोंडवे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये कायदेशीर फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

9 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago