लंडन मध्ये घुमल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा
शिक्रापूर (शेरखान शेख): छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत असताना लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठात शिकत असलेल्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ऋतुराज महेश ढमढेरे याने पुढाकार घेत या विद्यापीठाच्या आवारात सुमारे 200 भारतीय व अन्य देशातील विद्यार्थी एकत्र करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील ऋतुराज महेश ढमढेरे हा लंडन मधील ब्रुनेल विद्यापीठात शिकत असून त्याने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेत निसर्ग पवार, आदित्य तिठे, अभिषेक घावटे या मित्रांच्या सहकार्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार व भारतीय संस्कृती संपूर्ण जगाला आदर्शवत असल्यामुळे मोठ्या उत्साहात जगभरात शिवजयंती साजरी केली जात असताना लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठ परिसरात शिवजयंती साजरी करताना जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय यांसह आदी जयघोषाने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन व भगवा उंचावून सर्व विद्यार्थ्यांनी जयघोष करत मानवंदना दिली. तर शिरुर तालुक्यातील युवकाकडून लंडनमध्ये शिवजयंती साजरी केल्याने ऋतुराज ढमढेरे सह त्याच्या सहकाऱ्यांचे पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…