शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला.
मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथे वास्तव्यास होते. हे काम टुनटुन पंडित (वय 33) व्यवसाय लेबर कॉन्ट्रॅक्टर, रा. थापे मळा) यांच्या देखरेखीखाली चालू होते.
सदर ठिकाणी काम चालू असताना तोल गेल्याने अखिलेश कुमार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर तातडीने त्यांना श्री गणेशा हॉस्पिटल, शिरूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पो.ह.वा. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत असून, अधिक तपास सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…