मुख्य बातम्या

जांबूत येथे घरकुल घोटाळा ‘घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अस म्हणण्याची लाभार्थ्यांवर वेळ…

शिरुर (अरुणकुमार मोटे) घरकुल न बांधता परस्पर बिले काढून लाटल्याचा धक्कादायक प्रकार जांबुत येथे घडला असुन चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. जांबुत (ता.शिरुर) येथील मागासवर्गीय महिला उषा रमेश रणदिवे यांना इंदिरा आवास योजना सन २००३ मध्ये घरकुल लाभ मिळाला होता. पण लाभधारक उषा रमेश रणदिवे यांना त्याची कल्पनाच नव्हती, प्रत्यक्षात त्यांना घरकुलाचा लाभ मिळालाच नाही.वीस वर्षानंतर लाभार्थी बेघर असल्याने घरकुलाचा लाभ मिळावा. या अपेक्षेने जांबुत ग्रामपंचायतकडे घरकूलाची मागणी केली होती.

 

त्यावेळी लक्षात आले की रणदिवे यांच्या नावे आधीच कोणीतरी घरकूल घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी तक्रारी, अर्ज करून अधिकाऱ्यांना विनवणी केली. परंतु अधिकारी या बाबत जाणिवपुर्वक दखल घेत नसल्याने ‘कोणी घर देता का घर, घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अशी परिस्थिती रणदिवे कुटुंबीयांवर ओढवली आहे.

याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी चौकशी समिती स्थापन केली असुन चौकशी समितीने अहवालही सादर केला. या अहवालातील अभिप्रायानुसार सदर लाभार्थी उषा रमेश रणदिवे यांना ग्रामसभा ठरावाने इंदिरा आवास योजनेमधुन लाभ देणे कामी मंजुरी देण्यात आली होती. ग्रामपंचायत दप्तरी लाभार्थीचे घरकुल पूर्ण झाल्याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थीचे अनुदान नक्की कुठे गेले…? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना नमुना नं ५ वरुन रक्कम रुपये २८, ३१५/- अदा केल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सदर प्रकरणी सादर केलेल्या अहवालानुसार सदरील रेकॉर्ड २० वर्षापुर्वीचे असल्यामुळे संबधित रेकॉर्ड नाशपात्र असून ते रेकॉर्ड मुख्य कचेरी मार्फत पंपिंग केले असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे घरकुल निधी संबधित लाभार्थीच्या खात्यावर जमा झाला किंवा कसे याबाबत कागदपत्रां अभावी खात्री करता आली नाही.

 

परंतु पुर्ण झालेल्या घरकुलाची नोंद जांबूत ग्रामपंचायत दप्तरी नं.न.८ इमारती व जमीनीची नोंदवहीला नोंदविणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन ग्रामसेवकांनी घरकुलाची नोंद का केली नाही…? अहवालानुसार नोंद झालेली नसल्याचे दिसुन येत असल्यामुळे लाभार्थीस योजनेचा लाभ कोणाला मिळाला…? घरकुलाचे पैसे कोणी लाटले…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषी व्यक्तीवर अर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल, शासनाची फसवणुक, पदाचा गैरवापर, निधीचा अपहार आणि अभिलेखात हेरफेर करुन भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मीचे दर्शन’ झाले की काय…? अशीही दबक्या चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

शिरुर; डिंग्रजवाडी येथील ITW कंपनी जवळ पार्किंग भिंत कोसळली, दोन जण ठार, तर तीन जखमी

कवठे येमाईत पुन्हा एकदा चोरी पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

10 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

10 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

10 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

15 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

15 तास ago