मुख्य बातम्या

कवठे येमाईत पुन्हा एकदा चोरी पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास…

 

पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप 

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई मध्ये (दि १९) रोजी पहाटे दोनच्या दरम्यान महामार्गालगत असणारे श्री गणेशा ट्रेडर्स हे बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे दुकान मुख्य दरवाजा व शटर उचकटून टाकत आतील पत्रे,जाळी,इनव्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही,रिसिव्हर तोडून व इतर साहित्य असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत दुकानाचे मालक बाळासाहेब गावडे,निखिल मिडगुले यांनी ही माहिती दिली.

 

गावडे व मिडगुले यांनी दिलेल्या माहिती नुसार ते संध्याकाळी दुकान बंद करुन घरी गेले होते. सकाळी हार देणाऱ्या व्यक्तीने चोरी झाल्याची माहिती त्यांना दिली. ते दोघेही तात्काळ दुकानाकडे आले. दुकानात व आतील बाजूस लावलेल्या सीसीटीव्हीची (CCTV) चोरटयांनी तोडफोड केली होती. दुकानाच्या समोरील बाजूस दुसऱ्या दुकानाच्या सीसीटीव्हीत रात्री पावणेदोनच्या सुमारास एक पिकअप गाडी आतमध्ये दिसून आली. चोरट्यांनी चोरलेला सर्व माल या पिकअपमधूनच नेला असल्याचे गावडे यांनी सांगितले.

 

गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार दुकानाचे सीसीटीव्ही,त्याचे मशीन,बॅटरीसह इनव्हर्टर,५० पत्रे,१० तारेचे जाळी बंडल,व इतर साहित्य मिळून सुमारे पावणे तीन तीन लाख रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले आहे.या घटनेबाबत शिरूर पोलिसांना माहिती देण्यात असून कवठे येमाई परिसरात सातत्याने होत असलेल्या विविध प्रकारच्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

या घटनेचा परिसरात घडलेल्या डीपी चोऱ्या व इतर घटनांचा तात्काळ छडा न लागल्यास या भागातले शेतकरी,व्यापारी,
ग्रामस्थांसह शिरुर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा कवठे येमाईचे माजी सरपंच बबनराव मारुती पोकळे यांनी दिला आहे. तर रात्री कवठे येमाई येथे झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास लावू व यातील आरोपी गजाआड करू असे आश्वासन शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजन पाटलांनंतर बाळराजे पाटलांचे नाव चर्चेत

मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

1 तास ago

फडणवीस-शिंदेंचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरातून थेट इशारा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर…

1 तास ago

गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! म्हैस दूध दरात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी…

1 तास ago

राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे विकासाच्या रोडमॅपने उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…

6 तास ago

शिल्पकलेतील आधुनिक तंत्रज्ञान अन् व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन; १५० हून अधिक विद्यार्थी-शिल्पकारांचा सहभाग

पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…

6 तास ago

सीमेवर जवानांचे रक्त, महाराष्ट्रातून रक्तदानाची साथ; ‘सिंदूर महारक्तदान’मधून शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश

नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…

6 तास ago