मुख्य बातम्या

कवठे येमाईत प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे होणार मार्गदर्शन

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या तयारीचा खर्च खुप मोठा असतो. प्रत्येक पालकाला हा खर्च झेपावत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून कवठे येमाई येथील युवक सुरेश गायकवाड याने ओळखून ह्या सुविधा अतिशय मोफत दरात देण्याचे ठरवले आहे. कवठे येमाई व परीसरातील मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याची विनंती कवठे येमाईचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी यांनी केली आहे.

बेट भागात कवठे येमाई येथे स्वयंभु कॉम्प्युटर्स या नावाने सुरेश गायकवाड या युवकाचे महा-ई-सेवा केंद्र व CSC सेंटर सुरु आहे. ग्रामीण भागात गेल्या ९ वर्षांपासून कवठे व परिसरातील सर्व गावांना प्रामाणिकपणे सर्व सेवा पुरवण्याचे काम तो करत आहे. गावातील मुलांना शिकण्याची इच्छा असते. परंतु त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी मुलांना शहरात जावे लागते. तेथे येणारा खर्च हा अफाट असल्यामुळे अनेकांना हे शिक्षण घेणे शक्य होत नाही. तसेच जे पालक हा खर्च करतात त्यांना चांगल्या दर्जाचे क्लासेस मिळेलच याची शाश्वती नाही.

यामुळे आपल्या ग्रामीण भागातील मुले हि या प्रवेश परीक्षांना कमी पडताना दिसत आहेत. जर या मुलांची प्रवेश परीक्षेची चांगली तयारी करून घेतली गेली तर हि मुले भविष्यात चांगले करिअर करू शकतील. हीच प्राथमिक गरज ओळखून त्यांनी ई-लर्निंग सुविधा स्वयंभु क्लासेस या नावाने कवठे गावात सुरु करण्याचे ठरवले आहे. याद्वारे प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि १ ली ते १२ वी इ. चे क्लास ची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी ई-लर्निंग मध्ये अग्रगण्य असणाऱ्या EMBIBE (by Reliance Industries Ltd.) आणि kompkin या दोन कंपन्याशी करार करून या उच्च गुणवत्ता असलेल्या सुविधा आपल्या कवठे व कवठे परीसरातील मुलांना अगदी माफक फी मध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

1 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

1 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

1 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा…

2 दिवस ago

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार…

2 दिवस ago