शिरूर तालुका

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

शिक्रापूर (शेरखान शेख): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

समाजातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये व उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत मान्यता देण्यात आली असून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजना सह अन्य सोई सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात.

सदर योजनेंतर्गत शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज आळेफाटा ता. जुन्नर, एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल ( सीबीएसई ) अॅण्ड ज्युनियर कॉलेज वाघळवाडी ता. बारामती, तसेच एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज वनगळी ता. इंदापूर या 3 शाळांची निवड करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील धनगर समाजातील ज्या पालकांचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील समाज कल्याण पुणे च्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

12 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago