शिरुर (अरुणकुमार मोटे): गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच 4 जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) याचे नगर येथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 5 वर गेली आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी (दि. २३) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगावजवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले होते.
जखमींपैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. त्यातील समाधान साळवे याचा शनिवारी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो अकरावीत होता व वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…