मुख्य बातम्या

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या जातात आणि अनेक वेळा त्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील यांनी केले.

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन खरेदी करताना महिलांची होणारी आर्थिक फसवणूक याबाबत शिरुर तहसील कार्यालयात मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील आणि रविंद्र सानप उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक राऊत म्हणाले, सगळीकडे आज मोठया प्रमाणात ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले असुन ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली किंवा ऑनलाईन कर्ज देण्याच्या आमिषापोटी महिलांची मोठया प्रमाणात फसवणूक होत असुन अशी फसवणूकीला बळी पडणाऱ्या महिला फसवणूक झाली की,महीला दक्षता समिती मार्फत पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी घेऊन येतात. पोलीस स्टेशन याबाबत महिलांना कायमच सहकार्य करते. परंतु हे प्रकार टाळण्यासाठी महिलांनी सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे.

याबाबत रविंद्र सानप आणि अमर गायकवाड यांनीही मार्गदर्शन करताना यांनी आपण कसे फसलो जातो. तसेच काही गोष्टीच्या अमिषापोटी आपण पैसे वाचवण्याच्या नादात कधी फसलो जातो समजत नाही. म्हणून स्वतः जाऊन खरेदी करत जा, आमिष बळी पडू नका. यापुढे अशी फसवणूक होऊ नये म्हणून त्यावर काय उपाय केले पाहिजेत याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित काही महिलांनी आपण कसे फसलो याबाबत त्यांचे अनुभव कथन केले.

यावेळी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले, उपाध्यक्षा शशिकला काळे, शोभना पाचंगे, पत्रकार किरण पिंगळे, महीला दक्षता समितीच्या सदस्या अ‍ॅड. सीमा काशीकर, अ‍ॅड सरिता खेडकर, श्रुतिका झांबरे, राणी शिंदे, वैशाली गायकवाड, छाया हारदे, प्रियंका धोत्रे, ललिता पोळ, ज्योती हांडे, सारिका विर्सेव, विभावरी देव, वैशाली बांगर, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, लता नाझिरकर, विजया टेमगिरे, शारदा भुजबळ, अनिता कदम, प्रिया बिरादार, पुंडे, शेख, भोसले आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. या कार्यक्रमास आलेल्या सर्वांचे आभार शिरुर पोलीस स्टेशनचे राजेंद्र गोपाळे यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

2 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago