रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परीषद गटात प्रथमच आज (दि 28) रोजी शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) परिसरातल्या महिलांसाठी हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव तसेच त्यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याची माहिती रांजणगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्चना शिंदे तसेच शिवसेना युवा जिल्हाप्रमुख व रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी दिली.
रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद मध्ये प्रथमच एवढ्या मोठया प्रमाणात हळदी कुंकू समारंभ आणि वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन हजारो महिलांची कार्यक्रमासाठी उपस्थिती असणार आहे. तसेच महिलांसाठी खास सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे रांजणगाव गणपती येथील महागणपती देवस्थान पार्किंग मध्ये सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मातोश्री ट्रेडिंग कंपनीच्या सर्वेसर्वा स्वाती शिंदे व मातोश्री उद्योग समुहाचे किरण शिंदे यांनी दिली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…