मुख्य बातम्या

उच्च न्यायालयाची खातेदाराच्या कर्ज खात्यात अफरातफर केल्याप्रकरणी महानगर बँकेला समज

शिरुर (तेजस फडके): आपल्या देशात न्यायालयात अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. त्याची वेगवेगळी कारणे पण आहेत. परंतु “न्यायालय मे देर है, लेकिन अंधेर नहीं” असाच एक अनुभव शिरुर तालुक्यातील उद्योजक बाबासाहेब जासूद यांना आलेला आहे. जासुद यांच्या कर्ज खात्यात अफरातफर केल्याबाबत एका बँकेचा अध्यक्ष, व्यवस्थापक आणि इतर काही संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. परंतु त्याचा राग मनात धरून बँकेने राजकीय ताकतीच्या जोरावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरचं उलट गुन्हा दाखल केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला आणि त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा तोच जामीन कायम केलेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सन २०१५ ते सन २०१७ मध्ये, जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखा, भोसरी या बँकेने खातेदार बाबासाहेब जासुद यांच्या कर्ज खात्यामध्ये पैशांची अफरातफर केल्याने बाबासाहेब जासूद यांनी ऑगस्ट 2020 मध्ये भोसरी येथील जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखेचे मॅनेजर अभिजीत कस्तुरे, कुमार मुरलीधर नरवडे, बँकेचे चेअरमन व इतर संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

त्याचाच राग मनात धरून जी एस महानगर कॉ ऑप बँकेने राजकीय ताकतीच्या बळावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरच फसवणूकीचा उलट गुन्हा दाखल केला. त्यावेळी जासूद यांनी न्यायालयात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयात वकिलांमार्फत आपली बाजु मांडली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजुर केला. त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन कायम करत बँकेला समज दिली आहे. बाबासाहेब जासूद यांच्या वतीने त्यांचे वकील विरेश पूरवंत, नरेंद्र शर्मा, रचित खांपारीया यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे “शेवटी सत्याचाच विजय होतो” असे बाबासाहेब जासूद यांनी शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

24 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

24 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

24 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago