मुख्य बातम्या

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) गेल्या आठ दिवसात शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी उपसरपंचाने शिविगाळ, तर मित्र-मैत्रीणीमध्ये हाणामारी अशा गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे शिरुर न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याबाबतच्या सडेतोड बातम्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन शिरुर न्यायालयाने शिरुर पोलिस स्टेशनला सुरक्षेसाठी नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे.

 

गेल्या काही महीन्यांपुर्वी शिरुर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबारामध्ये एक महिला ठार झाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या आवारात एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन शिविगाळ केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्यानंतर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दारु पिवुन शिविगाळ करणाऱ्याला समज देऊन सोडण्यात आले. तर मैत्रिणीने मारणाऱ्या मित्रावर तक्रार देण्यास नकार दिला होता.

 

परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ह्या घटना चुकीच्या वाटत असल्याने ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने निर्भीड भुमिका घेत सडेतोड वृत्त प्रसिद्ध करत याबाबत आवाज उठवला होता. या बातम्यांची दखल घेत मा.न्यायालयाने बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिरुर न्यायालयात बंदुकधारी पोलिस नियमितपणे हजर राहणार आहेत. ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या धडाकेबाज वृत्तांकनाचे शिरुर वकील असोशियन संघटनेने आभार मानले आहेत.

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago