शिरूर तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ‘आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुंचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रती नेहमीच आदरच असला पाहिजे’ असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले. आज (दि २१) रोजी शिरुर येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रात मार्गदर्शन करत गुरुचे महान कार्य करणाऱ्या सर्वांना अशोक पवार यांच्या हस्ते “गुरुरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरुरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार पवार यांनी ज्यांना गुरुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, आई-वडील यांचे जीवनातील स्थान व गुरुविषयी आदर व्यक्त करत सर्वांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या.

 

आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातील बी के अर्चना,शकुंतला,सुप्रिया,वासंती ,वेदिका,अमृता,पूजा,वैशाली,सुमन,पूनम,अर्पिता,सुशीला ,जीवनविद्या मिशनचे शामकांत वर्पे, हभप रामदास महाराज फडके, हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर, महेश रासने, सनातन संस्थेच्या पंचफुला सोनटक्के या सर्वांना ट्रॉफी, शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरुर शहर महिलाध्यक्षा डॉ स्मिता कवाद, युवती शहरध्यक्षा गिता आढाव, सामाजिक कार्यकर्त्या शोभना पाचंगे, सुनंदा घावटे, सागर नरवडे, बिजवंत शिंदे, अ‍ॅड रविंद्र खांडरे, जेष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष सुरेश पाचर्णे, निलेश पवार, अमोल चव्हाण, भाग्यश्री लिंगे, कल्पना चांदगुडे, रोहिणी रासकर, शिला पाचंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिरुर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) व रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप

शिरुर येथील रामलिंग तसेच देव्हडेश्वर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

3 तास ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

6 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

21 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

1 दिवस ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

1 दिवस ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

1 दिवस ago