मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असुन पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष पावसे यांचा पुतण्या आदित्य हा (दि 20) सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वाजता माझे मित्र आले आहेत. असे सांगून घरातून निघून गेला. तो रात्री घरी न आल्याने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्याचा मित्र लांडे याने त्याचा मित्र अजिंक्य नरवडे यांच्यासोबत रांजणगावला गणपतीला गेले आहेत. तसेच रात्री त्यांची रांजणगाव येथील पेट्रोल पंप वाल्यांसोबत वादावादी झाली तेव्हा आदित्य तिथून पळून गेला आहे अशी माहिती दिली.

 

त्यानंतर (दि 21) सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादी यांचा मित्र सचिन घावटे यांच्याकडून त्यांना समजले की फिर्यादी त्यांचा पुतण्या आदित्य रामदास पावशे याने रांजणगाव येथे खंडाळे माथ्याजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

 

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

16 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago