Portrait of a leopard (Panthera pardus), Sabie-Sand nature reserve, South Africa?
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत आहे.
शुक्रवार (दि.२२) रोजी अशाच प्रकारे पिंपरखेड- जांबूत रस्त्यावर दोन बिबट्यांचा मुक्तसंचार अनेकांच्या निदर्शनास आल्याने महिलासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता.शिरुर) येथे सकाळच्या वेळी होणार असलेल्या एका दशक्रियेच्या विधीसाठी जाताना आणि विधी आटोपून परतताना रंगनाथ स्वामी मंदिराजवळ असलेल्या उसाच्या शेताच्या कडेला अनेक महिलांसह ग्रामस्थांनी रस्त्यावर मुक्तपणे संचार करणारा बिबट्याचा थरार अनुभवल्याने एकच तारांबळ उडाली.
तसेच या रस्त्याने अनेक दुग्ध व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी सकाळच्या प्रहरी ये-जा करत असतात. मात्र बिबट्यांच्या या संचारामुळे नागरिकासह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आपल्या पाल्यांची खबरदारी घेत पालकांनी त्यांना शाळेत पोहचविणे गरजेचे असून अशा प्रसंगी बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या जीवघेण्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…