मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल…पोलिसांपुढे मोठे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे) आमदाबाद (ता.शिरुर) येथील महादेव मंदिराजवळचे दोन विद्युत रोहित्र (Transformer) (दि २६) जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नासधूस करुन फोडले आहेत. चार दिवसापुर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि शिरुर पोलिसांनी विदयुत रोहीत्र चोरांना पकडले होते. या चोरांना पकडल्यानंतरही चार दिवसात सविंदणे येथील पडवळ यांचे एक विदयुत रोहित्र, निमगाव दुडे येथील एक, तर आमदाबाद येथून दोन विद्युत रोहीत्र चोरीला गेले आहे.

 

चार दिवसात चार विद्युत रोहित्र चोरीला गेल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आता अनेक विद्युत रोहित्र चोरीच्या टोळ्या सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. चोरांनी पोलिसांना खुले आव्हान तर दिले नाही ना…? असा प्रश्न निर्माण होत आहे. यात शेतकऱ्यांचा, महावितरणचा नाहक बळी जात आहे. यावर जो उपाय व्हायला हवा मात्र त्याकडेच दुर्लक्ष होत आहे.

 

जखम मांडीला अन मलम शेंडीला…

शिरुर पोलिसांच अस झालय की ‘जखम मांडीला अन पट्टी मात्र शेंडीला’ कारण चोर पकडले तरी ते पुन्हा नव्याने सक्रिय होतात हे काही नवीन नाही. यावर तंत्रज्ञानात बदल करुन तांबे या धातूशिवाय रोहित्र तयार करण्यावर भर द्यावा किंवा नव्याने तयार असलेले रोहित्र ज्यात तांबे धातू नसलेली रोहित्र शेतकऱ्यांना पुरविण्यात यावी हा उपाय असु शकत नाही काय…? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी

शिरुर; कामाची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, प्रांताधिकारी स्नेहा किसवे

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago