शिरुर (अरुणकुमार मोटे) नागरी भागातून म्हणजेच कोणत्याही कायद्यान्वये गठीत करण्यात आलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातुन जाणारे सर्व रस्ते नागरी वस्तीतुन जात असल्यामुळे अशा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग द्रुतगती मार्गाना व अन्य दर्जाच्या रस्त्यांना त्या शहराचे विकास योजना रस्ते (D.P. ROAD) म्हणून समजण्यात येते. शहराच्या विकास योजना रस्त्यासाठी त्या शहराच विकास व नियंत्रण व प्रोत्साहान नियमावलीप्रमाणे सामासिक अंतर प्रस्तावित करण्यात येतात.
शिरुर शहराच्या डीपी रोडमध्ये व रस्त्याच्या साईडपट्टीलगत जवळ, साईडपट्टीमध्ये भर पावसाळयामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे. परंतु शिरुर नगरपरिषद फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. सामासिक अंतर व साईडपट्टीतील कामांमुळे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. ठेकेदार संस्थेने कोणतीही, सुरक्षीतेचे बोर्ड लावलेले नाही. नगरपरिषद व ठेकेदार संस्था नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पावसळ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डांबरी रस्त्याचे कामे करु नयेत असा शासन आदेश असतानाही शिरुर नगरपरिषदेने गॅस पाईप लाईन टाकण्यास परवानगी दिली कशी…? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करुन ठेकेदार गॅस पाईप लाईन सामासिक अंतरामध्ये टाकत आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ काम स्थागित करण्यात यावे अन्यथा याविरुद्ध नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल. असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे शिरुर तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यात कंपनीचे शटरचे लॉक तोडून ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास
शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस
शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात