शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील जांबुत येथे भावकीच्या दोन गटात लोखंडी खोऱ्याने, लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण झाली असुन संजय देवराम गुरव यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दशरथ भैरव गुरव, चंद्रकांत भैरव गुरव,दत्तात्रय शिवराम गुरव या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात (दि 20) फेब्रुवारी रोजी सकाळी 8 च्या सुमारास जांबुत गावच्या हद्दीतील गुरवमळा येथे रामचंद्र विष्णु गुरव यांच्या घराजवळील रोडवर दसरथ भैरू गुरव, चंद्रकात भैरू गुरव आणि त्यांचा चुलत भाऊ दत्तात्रय शिवराम गुरव हे बोलत थांबलेले होते. त्यावेळी फिर्यादी संजय गुरव यांनी दसरथ भैरु गुरव, चंद्रकात भैरु गुरव यांना तुम्ही माझे चुलत भाऊ दत्तात्रय शिवराम गुरव यास “माझे विरुध्द का भडकावुन देता व त्यास चुकीचे मार्गदर्शन का करता” असे म्हणाल्याच्या कारणावरुन दसरथ भैरु गुरव याने त्याच्या हातातील लोखंडी खो-याने संजय गुरव यांच्या डोक्यात, हातावर मारहाण करून दुखापत केली.
त्यानंतर चंद्रकात भैरु गुरव याने त्यांना लाकडी दांडक्याने डोक्याच्या वरती कपाळावर मारहाण करुन तसेच दत्तात्रय शिवराम गुरव याने दगड हातात घेवुन दगडाने पाठीत मारहाण करत वरील तिघांनी खाली पाडुन हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…
मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…
शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…
मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…
शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…