Damusheth Ghode
शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी, जांबूत आणि नव्याने स्थापन झालेल्या म्हसे ,माळवाडी,शरदवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक जाहीर झाला असून दामुशेठ घोडे यांनी माळवाडी, म्हसेसह टाकळी हाजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापण केली आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान एकमेकांत खालच्या स्तरावर जावून टिकाटिप्पणी होत होती. तसेच प्लेक्स फाडण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे निवडणुक अगदी चुरशीची झाली होती.
टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी सरपंच दामूशेठ घोडे यांच्या दोन पॅनलमध्ये ही निवडणूक झाल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे या ग्रामपंचातीकडे लक्ष लागले होते. त्याचे कारण ही तसेच आहे. पोपटराव गावडे यांच्या घरातून आणि दामूशेठ घोडे हे राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार आहेत. या विजयावरच पक्ष उमेदवारी ठरवणार असल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांनी दिली आहे. मळगंगा ग्रामविकास या पॅनेलने मळगंगा परीवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला असून दामुशेठ घोडे यांच्यासह त्यांची पत्नी अरुणाताई घोडे यांनी दणदणीत विजय मिळवल्याने दामुशेठ घोडे हे राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार म्हणूण दावेदार मानले जात आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…