शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील गणेगाव दुमाला परिसरात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन या घटनेने आसपासच्या परीसरात खळबळ उडाली आहे. कल्पना रवींद्र शिंदे (वय ३१) व सचिन दौलत शिंदे (वय २४, रा. दोघेही, गणेगाव दुमाला, ता. शिरुर जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेने शिरुर तालुक्यासह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे (दोघेही रा. गणेगाव दुमाला, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संगमेश्वरवस्ती परीसरात कल्पना रवींद्र शिंदे तसेच सचिन शिंदे कुटुंबियांसोबत राहत होते. रविवारी (दि ४) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना कल्पना शिंदे यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे (वय २४) यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
दरम्यान याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले व पोलीस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.
शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले
शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…