मुख्य बातम्या

महावितरण (MSEDCL) वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत यांची कायदेशीर सल्लागारपदी निवड

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ( MSEDCL) वकील पॅनल वरती अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. महावितरण ( MSEDCL) यांनी वकील पॅनल करीता ठरवून दिलेल्या अटी व नियमांची पूर्तता अँड सावंत यांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राद्वारे करण्यात आली. महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून गेली अँड सावंत यांचा अनेक वर्षाचा कामाचा अनुभव पाहून एकमताने ठराव मंजूर करून महावितरणच्या ( MSEDCL) वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची कायदेशीर सल्लागार पदी आधिकृतपणे निवड करण्यात आली.

अँड सावंत यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित (PDCC BANK), जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान या सर्व ठिकाणी जवळपास 4 वर्ष पेक्षा जास्त वर्ष कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मध्ये असलेल्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वरती मोफत कायदेशीर सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत. अँड. सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत.

अँड सावंत यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, बँक, कंपनी यांची कामे पहिली आहेत तसेच कोटुंबिक दावे, धर्मदाय आयुक्त दावे, लेबर कोर्ट दावे, महसूल दावे, सिव्हिल दावे आणि क्रिमिनल दावे अशा स्वरूपाचे वकिली व्यवसायातील सर्व प्रकारच्या कामाचा अनुभवाची दखल घेऊन महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी अँड. संजय सावंत (पाटील) यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पॅनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे.

यासंदर्भात पुणे विभागाचे अधिकारी लीगल अँडव्हायजर (I/C) असलेल्या नितल हसे यांच्या मार्फत आधिकृत पत्र देण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महावितरणचे अधिकारी,प्राजक्ता कदम तसेच मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या पॅनल अँडव्होकेट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अँड. संजय सावंत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चे महाराष्ट्र राज्याचे संचालक राजेंद्र पवार, (CLA) आर.आर. गांधी, पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, असिस्टंट लॉ ऑफिसर दिनकर तिडके, पुणे विभागाचे अधिकारी लीगल अँडव्हायजर (I/C) नितल हसे आणि महावितरण कार्यालयचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे विशेष जाहीर आभार व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago