महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात ऊसाचे पाचट जाळताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू…

पुणे : पारगाव (ता. दौंड) येथे ऊसाच्या शेतातील पाचट जाळताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऊसाचे पाचट पेटवताना आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याला त्या आगीतून बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला आहे.

जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (ता. 22) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जालिंदर भाडळे यांनी आपल्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाल्यानंतर उरलेले पाचट नष्ट करण्यासाठी आग लावली होती. मात्र, त्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक वाढल्याने आगीने क्षणातच उग्र स्वरूप धारण केले. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण शेत व्यापले आणि भाडळे यांना चारही बाजूंनी वेढा घातला. धुराचे मोठे लोट आणि वाढत्या आगीमुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलता आले नाही. घटनेची माहिती उशिरा मिळाल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी भाडळे गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे पारगाव परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू…

समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

पुण्यात मित्रमंडळ चौकात भीषण अपघात, तरुणाचा होरपळून मृत्यू

नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago