शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जांबुत सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरुर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी (दि. १२) जानेवारी २०२३ रोजी दिला आहे.
या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली होती. त्यात नाथा जोरी हे संचालक म्हणून निवडून आलेले होते. परंतु त्यांना 6 अपत्ये असल्याची माहिती त्यांनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.
तक्रारदार संतोष मारुती जोरी यांनी याबाबत तक्रार करत पुरेसे पुरावे सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर केले होते. त्यामुळे संबंधित विभागाने अनेकवेळा सुनावणीसाठी तारखा देऊनही वैद्यकीय कारणास्तव नाथा जोरी सतत अनुपस्थित राहिल्याने, नियमानुसार व सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर त्यांचे पद हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क (अ) पोटकलम १ (vii) नुसार बरखास्त करुन, पुढे कोणत्याही सहकारी संस्था किंवा समितीवर नाथा जोरी हे निवडून जाण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, नुकत्याच झालेल्या जांबुत ग्रामपंचायत निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावलेले नाथा जोरी यांची या निर्णयामुळे राजकीय विकेट पडल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…