मुख्य बातम्या

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु असतना आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा आणि आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात प्रथम आढळराव पाटील उपस्थित होते. लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील अलीकडे अजित पवार यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधत आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की, आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते. या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजेर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे देखील आढळराव पाटील यांनी पाठ फिरवल्याची चर्चा होती. शिरुर लोकसभा मतदार संघात पराभवानंतर काही आमदार विचारात घेत नसल्याची खंत यापूर्वी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा शिरुर लोकसभा मतदारसंघात असून पहिल्याच दिवशी शिवाजीराव आढळराव पाटिल यांच्या गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी (२६ मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, पराभवाला सामोरे जावे लागले.

दादा स्वगृही परत या; आम्हाला तुमची गरज…आढळराव पाटील यांना शिंदे गटातील शिवसैनिकांचा आग्रह

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

18 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago