महाराष्ट्र

‘संगीतरत्न स्व. दत्ता महाडिक पुणेकर’ तमाशाचा देखावा…

मंचर, (कैलास गायकवाड): धामणी (ता. आंबेगाव ) येथे दिनकर रोकडे यांनी संगीतरत्न स्व.दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशाचा हुबेहूब देखावा साकारून महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्री. रोकडे यांनी सदर देखावा साकारण्यासाठी सहा महिने आगोदर तयारी केली होती. देखाव्यात दत्ता महाडिक तमाशाचे प्रवेश द्वार, राहुट्या, स्टेज, वाहतूक करणाऱ्या ट्रक, कनात इ. अगदी जशेच्या तसे दाखविण्यात आले आहे. या साठी त्यांनी कापड, प्लायवूड, फायबर, रेडियम, पुठ्ठे इ चा वापर केला आहे. आजू बाजूच्या गावातील रसिक देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

संगीतरत्न स्व.दत्ता महाडिक यांचे मूळ गाव बेल्हे (जुन्नर) असून एके काळी दत्ता महाडिक या नावाने महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांची स्वतः रचलेली व स्वतःच्या आवाजात स्वरबध्द केलेली गाणी अजरामर झाली. धामणीतील देखावा सोशल मीडियावर पाहिल्यावर स्व.दत्ता महाडिक यांचे चिरंजीव संजय महाडिक, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, संजय विश्वासराव, राकेश डोळस, दत्तात्रय लामखेडे, भाऊसाहेब करंडे यांनी भेट दिली व श्री. रोकडे यांचे कौतुक केले. या वेळी माजी सरपंच सागर जाधव, उपसरपंच अक्षय विधाटे, माधव बोऱ्हाडे, संतोष पंचरास , पमाजी पंचरास व ग्रामस्थ उपस्थित होते.

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

18 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago