shivajirao adhalrao patil

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय

मंचर: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाही. तालुक्‍यातील अनेक समस्यावर दोघेही एकमेकांना विश्‍वासात घेऊन काम करत आहोत. त्यामुळे गावातील विकास कामे करताना ग्रामस्थांनी पक्षीय राजकारण सोडून सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून निधी आणावा, असे आवाहन शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे. गावात एकोपा टिकविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार असल्याने विकासकामे जलद होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघात 50 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. सलग तीन वेळा खासदार झालो.’

मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झालो; मात्र खचून न जाता पुन्हा कामाला सुरवात केली. आज माजी खासदार असलो तरी मतदार संघात जातीने लक्ष घालून जनतेचे प्रश्‍न सोडवत आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.