मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात उद्या पिरसाहेबांची यात्रा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा उद्या मंगळवार (दि २८) ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी होणार असुन या यात्रेला राज्यभरातुन दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.

पारोडी येथील पिरसाहेब यात्रेची सुरुवात सोमवारी मध्यरात्री १२ च्या दरम्यान पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक निघाल्यानंतर संदल होणार आहे. त्यानंतर फुलांची चादर आणि मलिदाचा नैवेद्य अर्पण करुन भाविक व ग्रामस्थ यात्रेच्या मुख्य सोहळ्याची सुरुवात करतील. हि यात्रा सलग दोन दिवस चालणार असुन सर्व जातीधर्माचे नागरिक या उत्सवात सहभागी होतात.

पारोडी गावातील ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष राहुल ढमढेरे, उपाध्यक्ष भानुदास टेमगिरे आणि समस्त ग्रामस्थ पारोडी यांच्या पुढाकाराने यात्रेच्या आयोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या आणि पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पारोडी गावातील पिरसाहेब यात्रा हि केवळ धार्मिक सोहळा नसुन भक्ती, ऐक्य आणि परंपरेचे प्रतीक बनली आहे. भाविकांनी श्रद्धेने व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवार (दि २८) रोजी रात्री १० वाजता साहेबराव नांदवळकर तमाशा मंडळाच्या वतीने वगनाट्य सादर केले जाणार आहे. बुधवार (दि २९) रोजी सकाळी हजेरी आणि रात्रीसुद्धा साहेबराव नांदवळकर तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार (दि २९) रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला असुन यामध्ये शिरुर तालुक्यातील नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

23 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

24 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 दिवस ago