मुख्य बातम्या

रांजणगाव गणपतीत प्लॉट माफियांचा पर्दाफाश; बापूसाहेब शिंदेंच्या एकाच फोनने पीडिताला १५ लाखांची परतफेड

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती परिसरात प्लॉट देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचे घर घेण्याच्या स्वप्नासाठी कष्ट करणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील तरुण कामगाराची एका प्लॉट मालकाकडुन फसवणुक करण्यात आली. मात्र गोरगरिबांचे खरे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासुन वाचले असुन, १५ लाख रुपयांची परतफेड मिळाली आहे.

मूळचे श्रीपुर (ता. माळशिरस, जि. सोलापुर) येथील रहिवासी असलेले विश्वास राऊत, सध्या रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करतात. आयुष्यभराची कमाई आणि नातेवाइकांकडून उसनवारी करुन त्यांनी रांजणगाव गणपती येथे एक गुंठा प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला. प्लॉटधारकाने तो NA असल्याचे खोटे सांगत, बनावट कागदपत्रांच्या आधारे १६ लाखांचा व्यवहार उरकला.

त्यानंतर ते खरेदी-खतासाठी गेले असता आधी साईट बंद असल्याचे कारण दिले, तर सायंकाळी अचानक साईट उघडुन घाईघाईत व्यवहार लादण्यात आला. कोणतीही कागदपत्रे वाचू न देता खरेदी-खत न करता फक्त साठेखत व कुलमुख्तार करुन घेण्यात आले. काही दिवसांतच हा प्लॉट NA नसल्याचे उघड झाल्याने मोठी फसवणुक समोर आली.

प्लॉटच्या मालकाला पुर्ण रक्कम दिल्यानंतरही कागदपत्रे देण्यात टाळाटाळ सुरू झाली. सात-आठ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर जे कागद हाती लागले, त्यांनी फसवणुकीची खात्री केली. पैसे परत मागितले असता प्लॉटधारकाने, “तुला जे करायचं ते कर, पैसे परत मिळणार नाहीत,” असा दम देत दादागिरी केली.

या फसवणुकीमुळे विश्वास राऊत मानसिक तणावाखाली गेले. कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते; क्षणभर आयुष्य संपवावे असेही वाटले. मात्र कुटुंबाच्या आधारावर त्यांनी धीर धरला. मित्राच्या माध्यमातुन त्यांची भेट बापूसाहेब शिंदे यांच्याशी मातोश्री भवन कार्यालयात झाली.

संपुर्ण प्रकार ऐकून घेतल्यानंतर बापूसाहेब शिंदे यांनी संबंधित प्लॉटधारकाला थेट फोन करत फसवणुक खपवुन घेतली जाणार नाही, असा थेट इशारा दिला. त्यांच्या ठाम आणि निर्भीड भुमिकेमुळे घाबरलेल्या प्लॉट मालकाने सदर युवकाला स्वतःहुन फोन करुन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. अखेर १६ लाखांपैकी १५ लाख रुपये पीडित युवकाला परत मिळाले.

या घटनेनंतर विश्वास राऊत यांनी आई-वडील, पत्नी व लहान मुलासह बापूसाहेब शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “आई-वडील माझे पहिले गुरु आहेत; पण माझ्या कुटुंबाला वाचवणारे बापूसाहेब शिंदे हे माझ्या आयुष्यातील दुसरे गुरु आहेत,” असे त्यांनी डोळ्यात पाणी आणुन सांगितले. या प्रकरणामुळे रांजणगाव गणपती तसेच परिसरातील प्लॉटींग व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन, प्रशासनाने अशा फसवणुक करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

8 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago