रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील स्मशानभुमीसमोर रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्याच्या कडेला घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप फोडून तब्बल ५ लाख २९ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात निलम पांडुरंग तोडकर (वय ४८) यांनी फिर्याद दिली असुन त्यांचे कुटुंब दि २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घराला बाहेरुन कुलूप असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन लाखोंची चोरी केली. हा सर्व प्रकार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास तोडकर मोठा मुलगा सुयश घरी आला असता सेफ्टी डोअरचे लॉक व मुख्य दरवाज्याचा कडी कुलूप तुटलेले आढळले. हा प्रकार लक्षात येताच त्याने तातडीने आई-वडिलांना व पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर तोडकर दाम्पत्य घरी आल्यानंतर घरातील कपाटे उघडी, सर्व साहित्य अस्ताव्यस्त, रोकड- दागिने गायब होते. यावेळी कपाटातील दागिन्यांसह रोकडही चोरीला गेल्याचे लक्षात आले.
चोरीस गेलेला ऐवज खालीलप्रमाणे
१) ४९ हजार रुपयांची रोकड
२) २ लाख ८० हजार रुपयांचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण
३) २१ हजार रुपयांची ३ ग्रॅम सोन्याची अंगठी
४) ७० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या
५) ८४ हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम शॉट/मिनी गंठण
६) २५ हजार रुपये किंमतीचा चांदीचा गाठ्ठा
असे एकुण ५ लाख २९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोकड चोरांनी लंपास केली आहे.
या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.
Video; शिरुर शहराचा सर्वांगीण विकास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार : रोहिणी बनकर
Video: शिरुर तालुका डॉट कॉम च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या
शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…