leopard

शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात बिबट्याची दहशत समोर आली आहे. येथील एमआयडीसी रोड लगत राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन जर्सी कालवडींवर बिबट्याने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी रोड लगत भाऊसाहेब वाळुंज, संपतराव वाळुंज तसेच मोहन वाळुंज यांच्या शेताच्या तसेच घराच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. येथील शेतकरी निवास वाळुंज हे द्राक्षाच्या बागात ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करत असताना अचानक त्यांना समोर बिबटया दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरची रेस वाढविली. त्या आवाजाने बिबटया घाबरुन पळाला.

शेतकरी मोहन वाळुंज आठ दिवसांपुर्वी रात्री ८ च्या सुमारास गावात चालले असता. बिबट्याने त्यांच्या दुचाकी गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी मोहन वाळुंज यांनीही गाडी वेगात पळविल्याने पुढील अनर्थ टळला. आज (ता. २५) रोजी पहाटे दोन जर्सी कालवडीवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने येथे तत्काळ सापळे लावण्याची तसेच गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला

चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…