क्राईम

शिरूर तालुक्यात समाजकंटकाने शेतकऱ्यांची डाळिंबाची तब्बल १३०० झाडे तोडली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर ) येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असून अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जांबुत, शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपले शेतात दीड वर्षांपूर्वी भगवा जातीच्या तेराशे डाळिंब रोपांची सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. लाखो रुपयांचे भांडवल लावून सदर डाळिंब पिकाचा बहर त्यांचेकडून ठेवण्यात आलेला असुन सदर झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली होती. पुढील तीन महिन्यात सदर डाळिंब फळे काढण्यायोग्य होणार होता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटाकाकडून सर्वच १३०० झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन योग्य तपास करून या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे.

मागील दीड वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाचा सध्याच्या हंगामात त्यांनी बहर धरलेला होता. पुढील तीन महिन्यात डाळिंब फळे काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाची अशाप्रकारे समाजकंटका कडून झालेल्या नुकसानीमुळे लागवडपासून आजपर्यंत खर्ची घातलेले भांडवल आणि धरलेल्या बहर या सगळ्याचा विचार करता अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

सध्याच्या काळात कांदा पिकासह सर्व शेतमालांचे भाव पडलेले असुन शेतकरी मेटकुटिला आला आहे. लाखो रुपयांचे लावलेला भांडवली खर्च निघने देखील शक्य नसून त्यात अशा प्रकारे लाखो रुपयांचे भांडवल लावून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उध्वस्त व्हायला वेळ लागणार नसल्याने चुकीच्या पद्धतीने नुकसान पोहचविणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरुर तालुक्यात बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरी

शिरूर तालुक्यात तब्बल ४० किलो वजनाचा व १५-२० फुटांचा अजगर; शेळी गिळली…

MIDC परिसरातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरणी शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

शिरूर! रस्त्यावरील वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

20 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago