शिरूर तालुका

तुकडाबंदी अधिनियम सुधारणा व ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ योजनेची अंमलबजावणी करा : शरद बांदल

शिरुर (तेजस फडके) : तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करून गुंठेवारी दस्त नोंदणी सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा होऊन अनेक महिने उलटले असले, तरीही प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. तात्काळ ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड शरद तुकाराम बांदल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गुंठेवारी नोंदणी सुरू होईल या आशेवर अनेक लहान जमीनधारकांचे प्रश्न सुटतील, असे अपेक्षित असताना नोंदणी कार्यालयातून नागरिकांना अद्याप स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ॲड बांदल यांनी नमूद केले. “महिनोमहिने धावपळ करुनही नोंदणी प्रक्रिया सुरु नसल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

यासोबतच शासनाची ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ ही महत्वाकांक्षी योजना देखील अनेक ठिकाणी कागदावरच राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनेक दुय्यम निबंधक कार्यालयांकडून जिल्ह्यातील कोणताही दस्त नोंदणीस नाकारला जात असल्याचे महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर ॲड बांदल यांनी गुंठेवारी दस्त नोंदणीची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ योजनेचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व निबंधक कार्यालयांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा

तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर

तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती

गुंठेवारीच्या परवानगीसाठी ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, अर्जासाठी लागणार ‘ही’ ३ कागदपत्रे आवश्यक

बागायत जमीन 10 गुंठेही खरेदी करता येणार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

7 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

7 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

12 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

16 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago