sand-boat-shindodi

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) : चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात गेल्या सहा महिन्यांपासुन यांत्रिक बोटींच्या साह्याने मोठया प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा चालू असल्याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी निर्भीडपणे बातम्या दिल्या होत्या. त्या बातम्यांची दखल थेट पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आणि घोड धरणात वाळू चोरी करणाऱ्या ७ फायबर बोटी आणि ६ सेक्शन बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या.

या वर्षी मे महिन्यातच मुसळधार पाऊस झाल्याने चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण १०० टक्के भरले. याच गोष्टीचा फायदा घेत वाळू माफियांनी बेकायदेशीररीत्या यांत्रिक बोटीच्या साह्याने रात्रीच्या वेळेस घोड धरणातून वाळू चोरण्याचा सपाटाच लावला. त्यामुळे घोड धरणाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींच्या आवाजाने त्रास होत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)


त्यामुळे शिंदोडी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत शिरुरचे तहसीलदार तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन देत घोड धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने चाललेला अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी सडेतोड आणि निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने याच बातम्यांची दखल घेत दखल घेत मंगळवार (दि २५) रोजी शिरुर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील महसूलच्या पथकाने संयुक्त कारवाई करत घोड धरणात राजापुर, माठ (ता. श्रीगोंदा ) परिसरात उभ्या असलेल्या बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या ७ फायबर बोटी आणि ६ सेक्शन (यांत्रिक) बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू माफियांच पुरतं कंबरड मोडलं आहे. त्यामुळे सर्व स्तरातून ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदरची कारवाई शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावरेचे मंडल अधिकारी नंदकुमार खरात, तलाठी हर्षद सावळे, सिद्धार्थ वाघमारे, राजेंद्र बढे, श्रीकांत आढाव तसेच श्रीगोंदाचे मंडल अधिकारी राजेंद्र ढगे, तलाठी विनोद जाधव, महेश धुमाळ, महेंद्र शिंदे, बाबासाहेब भवर, राजीव सोळुंके, प्रशांत गौडकर, राजेंद्र भुतकर, प्रतिक धनवटे यांनी हि कारवाई केली.

वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
महसूल विभागाने आत्तापर्यंत चार वेळा कारवाई करत घोड धरणात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीं जिलेटीनच्या साह्याने फोडत वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. परंतु तरीही वाळू माफिया आठ दिवसानंतर पुन्हा सक्रीय होत वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावेत. तरच त्यांच्यावर जरब बसेल. याबाबत आम्ही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिरुर येथे लेखी निवेदन दिले असल्याचे शिंदोडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या