मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC त हॉटेल व लॉज मध्ये वेश्या व्यवसाय जोमात

शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आणि लॉजवर मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन सूत्रांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस MIDC काही संशयित लोक फिरत असुन पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे.

रांजणगाव MIDC मध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात बाहेरच्या राज्यातील कामगार विविध कंपन्यामध्ये कामासाठी येत असतात. त्यामुळे काही वर्षातच या ठिकाणी हॉटेल, लॉज मोठया प्रमाणात उभे राहिले. परंतु याच हॉटेल आणि लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्रीलायक माहीती मिळत असुन त्यामुळे हॉटेल तसेच लॉज मध्ये येणाऱ्या ग्राहकांना याचा मानसिक त्रास होत आहे.

unique international school

तसेच रांजणगाव MIDC त असलेल्या काही हॉटेल मध्ये सुद्धा वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत नुकतंच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं कार्यालय सुरु झालं आहे. त्यामुळे हि बाब गंभीर असुन उपविभागीय पोलीस अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का….? असा प्रश्न विचारला जात आहे.

याबाबत शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, जर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही हॉटेल किंवा लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालत असेल तर लोकांनी निर्भीडपणे पुढे येऊन पोलिसांनी माहीती द्यावी माहिती देणाऱ्याच नाव गुपित ठेवलं जाईल. तसेच सबंधित हॉटेल किंवा लॉजवर कडक कारवाई केली जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

1 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

1 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago