कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथील मनी ट्रान्सफारच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयत्याचा धाक दाखवत दहशत करुन ३५ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या रांजणगाव MIDC पोलिसांनी २४ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे ज्ञानेश्वर कान्हु डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचे मनी ट्रान्सफारींगचे ग्राहक सेवा केंद्र असुन या दुकानामध्ये दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास कारेगाव येथील सराईत गुन्हेगार १) प्रथमेश उर्फ बच्चा नवले याने त्याचे साथीदार आरोपी २) आर्यन नवले ३) ओम पवार ४) वैभव गाडे यांनी येवुन हातामध्ये लोखंडी कोयते घेवुन दहशत माजवत ज्ञानेश्वर कान्हु डांगे व त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश हिरामण डांगे यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्यांच्याकडुन काऊंटरच्या गल्ल्यातील ३५ हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली.
याबाबत फिर्यादी ज्ञानेश्वर कान्हु डांगे यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला (Ranjangaon MIDC Police) फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घडल्याबाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार माऊली शिंदे यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळावरील सिसीटिव्ही (CCTV) फुटेजची पहाणी केली असता त्यामध्ये एकुण पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करुन रवाना केली होती. या तपास पथकाच्या मदतीने रात्री व दिवसभर शोध घेवुन सदर गुन्हयातील आरोपी १) ओम दिलीप पवार (सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि. पुणे) मुळ रा. नाथनगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर २) वैभव धोंडीभाऊ गाडे मुळ (रा. चांडवली, ता.खेड.जि.पुणे) यांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आलेली असुन त्याच्या सोबतचे इतर दोन अल्पवयीन आरोपीना सुद्धा गुन्हयाच्या तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा नवले याचा तपास पथकाच्या मदतीने शोध सुरु आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माऊली शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल आकाश सवाणे, किरण आव्हाड यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…