मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव परिसरात भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवत तब्बल 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीला रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले होते.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजता संगिता परमेश्वर शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या कारेगाव येथून शिरुरच्या दिशेने जाण्यासाठी एका कारला हात दाखवून बसल्या होत्या. मात्र, गाडीतील अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील व कानातील सुमारे 8 ग्रॅम वजनाचे, 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांना शिरुर बायपास येथे सोडून पलायन केले.

हृदयद्रावक! शिरूर बायपासवर लुटारूंच्या तावडीतून वाचला जीव अन् पुढे नियतीचा क्रूर खेळ…

दरम्यान, पीडित महिला एका ओळखीच्या व्यक्तीसोबत दुचाकीवरुन गावी निघाल्या असताना त्यांच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या भीषण अपघातात संगिता शिंदे यांचा मृत्यू झाला. मात्र, अपघातापूर्वी त्यांनी आपला मुलगा प्रभू शिंदे याला फोन करुन आपल्यासोबत झालेल्या जबरी चोरीची माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे मुलाने रांजणगाव MIDC पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ आणि दीपक दळवी यांनी कारेगाव परिसरासह पुणे-नगर महामार्गावरील तब्बल 25 ते 30 CCTV कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी विनोद अनिल जाधव (वय 36, रा. बाभुळस खुर्द, ता. शिरुर) याची ओळख पटवून त्याला अवघ्या 24 तासांत अटक केली.

या आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH 12 EG 2585 क्रमांकाची स्विफ्ट कार आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 6 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अपहरण, खून आणि जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग, अतिरिक्त कार्यभार शिरुर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

या कारवाईत पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, दिपक दळवी, संदीप भांड, नितीन दळवी, प्रतिक खरबस, पंडित मुंढे तसेच शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे आणि नितेश थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावत कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणला. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.

या जलद, संवेदनशील आणि तांत्रिक तपासामुळे मृत महिलेला तिच्या मृत्यूनंतरही रांजणगाव MIDC पोलिसांनी संवेदनशीलता जपत न्याय मिळवून दिल्याने पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह रांजणगाव MIDC पोलिसांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

19 मिनिटे ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

7 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

8 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

23 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago