मुख्य बातम्या

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पुन्हा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्ह्याच लक्ष लागलेल्या आणि शिरुर तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असलेल्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. गेली 25 वर्ष असलेली सत्ता अबाधित ठेवण्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा यश आलं असुन अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनेलचे 20 तर शेतकरी सभासद पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार निवडून आल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालय येथे मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्यांदा मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव या गटातील मतमोजणी करण्यात आली. यात शेतकरी पॅनलचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार, उमेश साठे, नरेंद्र माने, सचिन मचाले,संभाजी फराटे तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या दादा पाटील फराटे यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली होती तर दुसऱ्या फेरीत सर्व उमेदवारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्यावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला असुन आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे दुर्बल घटकातून बिनविरोध निवडून आले होते.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनेल व भाजप पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनल या दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत झाली. “मताला नाही पण उसाला तीन हजार रुपये भाव देणारच” हे ब्रीदवाक्य घेऊन घोडगंगा किसान क्रांती पॅनलने अशोक पवार यांच्यामुळेच कारखान्यावर 450 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा झाला असे गंभीर आरोप केले. शेतकरी पॅनलचे आमदार अशोक पवार यांनी विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध केले तर राजकारण सोडुन देईल आणि आरोप सिद्ध नाही झाले तर विरोधकांनी राजकारण सोडण्याची तयारी दाखवावी असे प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांची तर भाजपच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मांडवगण येथे सभा झाल्याने या निवडणुकित खरी रंगत आली होती.

यावेळी विजयाबद्दल बोलताना आमदार अशोक पवार यांनी हा विजय माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य सभासदांचा असून निवडणूक काळात विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केल्याने मतदारांनी त्यांना नाकारले असे सांगितले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात पिता पुत्रांची दमदार एंट्री झाल्याने एकाच सभागृहात पिता-पुत्र एकत्र काम करताना दिसणार आहेत. रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्रांना एकाच वेळी संचालकदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणार आहे.रावसाहेब पवार व अशोक पवार यांच्यानंतर ऋषीराज पवार ही तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करत आहे. मतमोजणीच्या वेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीप्रमाणे :

गट क्रमांक 1-मांडवगण फराटा

संभाजी शिवाजी फराटे (7180),

दादासाहेब गणपत फराटे (6938)

गट क्रमांक-2 इनामगाव

सचिन बाबासाहेब मचाले (7768),

नरेंद्र आण्णासो माने (7452)

गट क्रमांक -3 वडगाव रासाई

अशोक रावसाहेब पवार (8172),

उमेश सुदाम साठे (7409),

गट क्रमांक -4 न्हावरे

संजय ज्ञानदेव काळे (7826),

शरद मोहनराव निंबाळकर (7732),

मानसिंग सीताराम कोरेकर (7639)

गट क्रमांक 5- तळेगाव ढमढेरे 

सोपान वाल्मिकराव गवारी (7686),

विश्वास रामकृष्ण ढमढेरे (7362),

पोपट रामदास भुजबळ (7136)

गट क्रमांक 6 – शिरूर

वाल्मिक धोंडिबा कुरुंदळे (7619),

सुहास नारायण थोरात (7417),

प्रभाकर नारायण पाचुंदकर (6378)

महिला राखीव

मंगल सुहास कोंडे (7645),

वैशाली सुनील जगताप (7551)

अनुसूचित जाती जमाती

उत्तम रामचंद्र सोनवणे (7614)

इतर मागास प्रवर्ग

शिवाजी मुक्ताजी गदादे (7426)

भटक्या विमुक्त जाती जमाती

बिरा बाबू शेंडगे (7201)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago