क्राईम

पुण्यात विचित्र अपघात, 9 वाहनांची एकमेकांना धडक

पुणे: पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवीन कात्रज बायपासजवळ विचित्र अपघात घडला. लक्झरी बस, कार आणि कंटेनर ट्रकसह 9 वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातात 15 जण जखमी झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस साताऱ्याच्या दिशेकडून मुंबई च्या दिशेने निघाली होती. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर दरी पुलावर हा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी पोहचले आणि त्यांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कंटेनरला पाठीमागून बसने धडक दिल्याने बसमधील ८० टक्के प्रवासी जखमी झाले. बसमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते याची माहिती मिळाली नसली तरी बस पूर्ण क्षमेतेने भरली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या अपघातात बसचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून बसच्या केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात कोणी जखमी नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावतीत कुऱ्हा मार्गावर रिक्षाला ट्रकची धडक, 2 जणाचा मृत्यू दरम्यान, तिवसा ते कुऱ्हा मार्गावर वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी असून जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago