मुख्य बातम्या

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम यांचा समावेश असून, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात मदत घेतली.

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अलीकडच्या काळात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना तपास पथकाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून अज्ञात व सराईत गुन्हेगारांचा माग काढण्यात तपास पथकाला यश आले. त्यानंतर विविध पथकांनी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

२७ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत जप्त केलेला सर्व मुद्देमाल शिरूर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात संबंधित १८ गुन्ह्यांच्या फिर्यादींना परत करण्यात आला. चोरी गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप गिल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , तसेचपोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष कारवाई पोलीस हवालदार बापू मांगडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना यादव यांच्यासह तपास पथकाने केली. त्यांच्या मेहनतीतूनच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल परत मिळवणे शक्य झाले.

गुन्ह्यांतील मुद्देमाल परत मिळणे हे कोणत्याही फिर्यादीसाठी अत्यंत दिलासादायक असते. या प्रकरणात शिरूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, तपशिलवार तपास आणि तांत्रिक प्रगतीचा प्रभावी उपयोग यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर पोलिसांच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात एक महत्त्वाची भर पडली असून, गुन्हेगारांनाही याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या हातापासून सुटका अशक्य आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

4 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago