शिरूर तालुका

खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिरूर : श्री तीर्थक्षेत्र खंडाळे (रांजणगाव गणपती) येथे संत परंपरेचा गौरव वाढवणारा श्री संत श्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिर व संत पंचायतन मंदिर या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास समारंभाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे ज्ञान-भक्ती परंपरेचे प्रतीक ठरणाऱ्या या पवित्र उपक्रमाने खंडाळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था व नंदकिशोर गोशाळा, तसेच एकनाथ महाराज गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज खेडकर यांच्या संकल्पनेतून हे भव्य मंदिर उभारण्याचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर समस्त वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्षात उतरला.

पवित्र वेदमंत्रांच्या नादात व भक्तीभावनेने ओथंबलेल्या वातावरणात भूमिपूजन–शिलान्यास हा मंगल सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी साधकहृदय डॉक्टर बाबा, साधकहृदय नंदकिशोर दादा, साधकहृदय मोठे कदम माऊली, श्रीकृष्णकृपांकित विकासानंद मिसाळ महाराज, नाथवंशज योगेश महाराज गोसावी, निळोबाराय वंशज गोपाळ महाराज मकाशीर, तुकोबाराय वंशज प्रशांत महाराज मोरे, माऊली महाराज कुऱ्हाडे, अशोक सावंत अध्यक्ष संत निळोबाराय संस्थान, यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडताच परिसर “जय जय रामकृष्ण हरी”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

या सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यामध्ये प्रमुख मा. आमदार पोपटराव गावडे, मा. सभापती आरतीताई भुजबळ, मानसिंगभैया पाचुंदकर, जि.प. सदस्या स्वातीताई पाचुंदकर, बापूसाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष युवासेना तसेच शिरूर, दौंड, पारनेर, हवेली, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुक्यातील अनेक वारकरी महाराज, भक्तगण, तसेच खंडाळे, रांजणगाव गणपती पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी आणि हजारो नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या सोहळ्यात साधुसंतांच्या आगमनाने खंडाळे येथे भक्तीचा महापूरच पाहायला मिळाला. ‘साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ या भावनेने संपूर्ण वातावरण मंगलमय झाले. भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या भावनेने हा दिवस ऐतिहासिक ठरला.

दरम्यान, मंदिर उभारणीसाठी अनेक दानशूर देणगीदारांनी लाखो रुपयांची देणगी जाहीर करत या पुण्य कार्यास शुभारंभ केला. समारोप प्रसंगी आयोजकांनी सर्व उपस्थित मान्यवर व देणगीदारांचे आभार मानले.

संपर्क :
संतोष महाराज खेडकर 9551517799
दादाभाऊ नरवडे 9623026405

खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे खंडाळे गावच्या कार्यकर्त्याचा गौरव

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

3 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

6 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

7 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

7 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

7 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

8 तास ago