मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत.

लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे) हे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेत गट क्रमांक ८०८१ मधून घोडनदी पात्रातून काढलेली बेकायदेशीर वाळू हायवाने नेण्यात येत असल्याने शेताचे मोठे नुकसान होत होते. याला त्यांनी विरोध केल्याचा राग मनात धरुनन वाळू तस्करांनी थेट शेतकऱ्यावरच हल्ला चढवला.

दि. १३ जानेवारी २०2६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजय पवार, अजय धावडे, बाबू जिउघाले, विशाल पवार व इतर ५ ते ६ जण इर्टीगा कार व मोटारसायकलवरुन लगडवाडी येथे कोळपे यांच्या घरासमोर आले. “तुला फार माज आला आहे का…? आमची वाळूची गाडी अडवणार का…?” अशी दमदाटी करत अजय धावडे याने काठीने लक्ष्मण कोळपे यांना मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले.

हा हल्ला सोडवण्यासाठी आलेल्या कोळपे यांच्या वृद्ध आई कुसूम यांनाही विशाल पवार याने लोखंडी गजाने पाठीवर मारहाण केली. याहूनही संतापजनक प्रकार म्हणजे कोळपे यांची पत्नी अश्विनी कोळपे ६ महिन्यांची गरोदर असताना तसेच भावजई आशा कोळपे यांनाही आरोपींनी पोटात लाथा मारत मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली.

या घटनेनंतर नागरिकांनी हस्तक्षेप करुन जखमींना वाचवले. सर्व जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, लक्ष्मण कोळपे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, वाळू माफियांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, आरोपींना अटक करावी व पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा उच्छाद सुरु असताना प्रशासन याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शिरुर तालुक्यात वाळू उपशावरुन दोन गट आमनेसामने; फायटर व दगडांनी हल्ला…

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

2 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

2 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

3 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

8 तास ago