Shirur Police Station

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असुन दिवसेंदिवस शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे. शिरुर तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण वाढतं असल्याने औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणात परप्रांतीय कामगारांचे वास्तव्य असल्यामुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या ठेक्यावरुन अनेकवेळा जीवघेणा संघर्ष झालेला आहे. सध्या शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत सापडलेले गावठी कट्टे या घटनेलाही वाळू माफियांच्या वादाची किनार असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालु आहे.

 

शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील वाळू डेपोच्या ठिकाणी वाळूच्या पैशावरुन दोन ठेकेदारांची तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यातील एका ठेकेदाराने आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे वाळूचा ठेका घेतला होता. त्यावेळी स्थानिक लोकांशी संबंधित ठेकेदाराचा वाद झाल्याने स्थानिकांनी वाळूचा एक ट्रॅक्टर जाळून टाकल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच मध्यप्रदेश मधुन शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली. यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या वाळू माफियाशी पारगाव येथील स्थानिक लोकांचा वाद झाला. तो वाळू माफिया वापरत असलेल्या आलिशान गाडीत मध्यप्रदेश इथुन गावठी कट्टे आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा उधाण आले आहे.

 

शिरुर पोलिसांची भुमिका महत्वाची…

शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीन ठिकाणी पोलिस स्टेशन असुन शिक्रापुर आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत 8 गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी काही व्यक्तींना अटक केली होती. त्यानंतर आता शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत 3 गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस सापडले असुन त्याच्या पाठीमागे वाळू माफियाच्या वादाची किनार असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी यात सखोल तपास करावा अशीही मागणी होत आहे.

शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त

शिरुर तालुक्यातील त्या लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका