वाघाळे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील वाघाळे (पासुडीमळा) येथील शामराव एकनाथ शेळके (वय 43) यांचे आज (शुक्रवार) पहाटे सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाघाळे (पासुडीमळा) येथे आज दुपारी 1 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शामराव शेळके यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय, तीन बहिणी असा परिवार आहे. शिरुर तालुका शिवसेना शेतकरीसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके यांचे ते बंधु आहेत.
शामराव शेळके यांची युवा उद्योजक म्हणून ओळख होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थीती नाजूक असतानाही त्यांनी मोठ्या कष्टाने यशस्वी उद्योजकापर्यंत मजल मारली होती. पुणे जिल्ह्यासह विविध भागांमध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…