शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला…

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करत हत्या करण्याचे प्रकार सुरु असताना शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा करायची आहे अस सांगत एका ठिकाणी बोलावून घेत नंतर बंदूकिचा धाक दाखवत त्याचे अपहरण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करुन त्यानंतर त्याला अष्टविनायक महामार्गावर कवठे-पारगाव रस्त्यावरील लाखणगाव वनविभागाच्या क्षेत्रात नेऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन हि घटना रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव गणपती ते बाभुळसर खुर्द या अष्टविनायक महामार्गावर फिर्यादी अजित हनुमंत ढेरंगे (रा. कुरुंद, हमालवस्ती, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आरोपी प्रविण वाळके, समीर ऊर्फ सोन्या तिरखुंडे, सागर तिरकुंडे, हर्षद गोसावी, जासुद या सर्वांनी फिर्यादी अजित ढेरंगे याला तुझ्या जुन्या केसच्या संदर्भात बोलायचं आहे असं सांगत अष्टविनायक महामार्गावर बोलून घेतले.

त्यानंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवत वरील सर्वांनी त्याला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवत भांबर्डे येथील डोंगरावर घेऊन गेले. त्यानंतर लाकडी दांडके तसेच कोयत्याने डोक्यात व हातावर वार करत जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला नंतर कवठे येमाई-पारगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन गंभीर अवस्थेत सोडून दिले. ही घटना एका प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्याने त्वरीत पारगाव पोलिस स्टेशनला संपर्क केला. त्यानंतर जखमी फिर्यादीला मंचर येथे वैद्यकीय ऊपचारासाठी पाठवण्यात आले.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसमध्ये वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसारे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.