मुख्य बातम्या

शिंदोडीत बिबट्याची दहशत, पिंजरा लावण्याची वनविभाकडे मागणी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील निमोणे, गुनाट, शिंदोडी या परिसरात नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असुन शिंदोडी परीसरात महिन्यापासुन बिबट्याने अनेक कोंबड्या, शेळ्या, कुत्री फस्त केली असुन काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे. शिरुर तालुक्यात जांबुत येथे बिबट्याने एका व्यक्तीस खाल्ले असुन एकावर हल्ला केल्याने शिंदोडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी केली आहे.

ranjangaon-mutadwar-darshan

शिंदोडी येथे गेल्या महिनाभरापासुन बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या तसेच कुत्री यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत असुन दिवसा शेतात जायला शेतकरी घाबरत आहेत. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ धाडस करत नसुन शिंदोडी मध्ये ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे.

सध्या गणेशोत्सवामुळे प्रत्येक गावात अनेक ठिकाणी गणपतीच्या आरतीसाठी ग्रामस्थ पायी जात असतात. परंतु शिंदोडी, गुनाट, निमोणे परिसरात बिबटयाचा वावर वाढल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी शिरुर येथील वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना संपर्क साधुन पिंजरा लावण्याची विनंती केली असुन तीन दिवसात गावात पिंजरा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे ओव्हाळ यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम ” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago