मुख्य बातम्या

शिरूरचे नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना ‘उत्कृष्ट अधिकारी’ पुरस्कार

महसूल दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले महसूल नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील उल्लेखनीय व कार्यक्षम कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट अधिकारी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महसूल दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपुर्ण पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधून निवड झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रकाश मुसळे यांचा समावेश हे शिरूरसाठी गौरवाचे ठरले आहे.

प्रकाश मुसळे यांनी शेतकरी समस्या, आपत्ती व्यवस्थापन, जमीन नोंदणी प्रक्रिया, वारस व इतर दाखले, महसूल नोंदींचे डिजिटायझेशन अशा विविध बाबतीत सुसूत्र, पारदर्शक व नागरिकाभिमुख कार्यप्रणाली राबवून उल्लेखनीय योगदान दिले आहे. नागरिकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार, वेळेवर सेवा व प्रशासनातील सजगता यामुळे ते लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

पुरस्कार स्वीकारताना नायब तहसिलदार मुसळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे. माझ्या कामात जनतेचा विश्वास व सहकार्य हेच माझे बळ आहे. भविष्यातही मी ही सेवा प्रामाणिकपणे सुरू ठेवणार आहे.”या गौरवामुळे शिरूर तालुक्याच्या प्रशासनाचा दर्जा उंचावला असून, प्रकाश मुसळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विविध शासकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

7 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago