शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मंडल रांजणगाव गणपती, ता. शिरूर, येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.
या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे दाखले जसे की उत्पन्न, जात, रहिवासी, अल्पभूधारक, बिनविरोध, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते खातेदारांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज याच ठिकाणी स्वीकृत करण्यात आले, ज्यामुळे योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
या शिबिरात महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, सेतू नागरी सुविधा केंद्र, सामाजिक वनिकरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पाटबंधारे विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वन विभाग व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल प्रकरणांमध्ये प्रलंबित फेरफार जलदगतीने निकाली काढणे, खातेदारांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता.
या शिबिराच्या माध्यमातून शासनाचा “नागरिक हित प्रथम” हाच दृष्टिकोन अधोरेखित झाला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम ग्रामपातळीवर पारदर्शक प्रशासन व प्रभावी सेवा वितरणाचा आदर्श ठरला आहे.या उपक्रमास ग्रामस्थ, शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ व खर्च वाचल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
स्वाती तावरे – मंडल आधिकारी, रांजणगाव गणपती
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…