मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील HDFC बँकेत बनावट सोने गहाण ठेवुन तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांचे गोल्ड लोन उचलत बँकेची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 12 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिरुर, रांजणगाव आणि श्रीगोंदा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शैलेश लालासाहेब जाधव (वय 33, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी HDFC बँकेच्या वतीने फिर्याद दिली आहे.

जानेवारीपासून सुरु होता बनावट सोन्याचा खेळ…

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत रांजणगाव येथील HDFC बँकेत आरोपींनी संगनमताने बनावट सोने खरे असल्याचे भासवुन गहाण ठेवले आणि त्यावर गोल्ड लोन मंजुर करुन घेतले. या माध्यमातुन बँकेची तब्बल 17.76 लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली. या संपूर्ण रॅकेटचा सुत्रधार म्हणुन लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याचे नाव पुढे येत असुन, त्याच्या सांगण्यावरुन इतर आरोपींनी बनावट दागिने बँकेत जमा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील आरोपी खालीलप्रमाणे

1) लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर

2) मच्छिंद्र दिगंबर खैरनार, रा.संकल्प सिटी, रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे

3) प्रतीक दादा मांडगे, रा. रांजणगाव मज्जिद, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर

4) किरण हौसराव सुरवसे, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे

5) ऋषिकेश मधुकर देशमुख, रा. बाभूळसर, ता. शिरुर, जि. पुणे

6) तन्मय नानासाहेब जगदाळे

7) दीपक नाना बोराडे, रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे

8) बाजीराव सिताराम शेळके, रा. राजापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर

9) अभिषेक यशवंत जोंधळे, रा. शिरुर, ता. शिरूर, जि. पुणे

10) मयुर रंगनाथ लंघे, रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे

11) संजय हिराचंद पंडित, रा. हडपसर, सोलापूर रोड, ता. हवेली, जि. पुणे

12) प्रवीण गवळी, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे

गोल्ड लोन व्हॅल्यूअरवरही गंभीर आरोप…

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे HDFC बँकेकडुन नेमण्यात आलेल्या गोल्ड लोन व्हॅल्यूअरवरच फसवणुकीचे आरोप झाले आहेत. आरोपी संजय हिराचंद पंडित याने संबंधित सोने बनावट असल्याची माहिती असतानाही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यामुळे हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून, बँकिंग यंत्रणेमधील संगनमताचा मोठा घोटाळा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोन आरोपी अटकेत…

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार यांना दि 25 मे 2026 रोजी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी आरोपी लक्ष्मण वीर याला दि 29 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आरोपी मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बँकिंग व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह…?

बनावट सोने थेट बँकेत गहाण ठेवले जाते, व्हॅल्यूअर त्याला खरे असल्याचे प्रमाणपत्र देतो आणि लाखोंचे कर्ज मंजूर होते. या संपुर्ण प्रकारामुळे खासगी बँकांच्या गोल्ड लोन पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “सामान्य नागरिकांनी बँकेवर विश्वास ठेवायचा तरी कसा…?” असा सवाल आता नागरिकांमधुन विचारला जात आहे. काही हजारांच्या कमिशनसाठी जर बनावट सोन्याला खरे ठरवले जात असेल, तर आर्थिक व्यवस्थेची सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत असून, या रॅकेटचे इतर जिल्ह्यांशीही संबंध आहेत का, याचाही तपास सुरु आहे. आणखी काही आरोपी आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

5 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

6 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

6 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

6 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

7 तास ago